सोयाबीन

सुधारित वाण

जे.एस.३३५, एम.ए.सी.एस.११८८, फुले कल्याणी (डी.एस.२२८), जे.एस.९३०५, के.एस.१०३, फुले अग्रणी( केडीएस ३४४)

पेरणी व लागवड पद्धत

भारी जमीन: ४५ सें.मी. X ०५ सें.मी.
मध्यम जमीन: ३० सें.मी. X १० सें.मी.

बियाणे

सलग पेरणी: ७५ - ८० किलो प्रती हेक्टर
टोकन पेरणी: ४५ - ५० किलो प्रती हेक्टर

खत व्यवस्थापन

भरखते: चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्टरी २५ ते ३० गाडया वापरावे.
वरखते: सोयाबीन पिकास हेक्टरी ५० किलो नत्र आणि ७५ किलो स्फुरद पेरणीच्या वेळी द्यावे.

उत्पादन

सोयाबीन पिकाचे उत्पादन सरासरी २० ते २५ क्विंटल/हेक्टर.