सुर्यफुल

सुधारित वाण

वाण कालावधी (दिवस) उत्पादन (किं./हे) वैशिष्ट
फुले भास्कर ८० - ८४ १५ - १८ कमी कालावधी, चमकदार काळेभोर टपोरे दाणे तेलाचे प्रमाण अधिक व महाराष्ट्राच्या अवर्षण भागासाठी प्रसारित.
एस.एस.५६ ८० - ८५ १० - ११ कमी कालावधी, उशिरा पेरणीस योग्य, दुबार, आंतरपीक पद्धतीस व अवर्षण प्रवण भागास योग्य.
मॉर्डेन ८० - ८५ ८ - १० कमी कालावधी, बुटकी, उशिरा पेरणी, दुबार आंतरपीकास योग्य.
ई.सी.६८४१४ १०० - ११० १० - १२ अधिक उत्पादनक्षम, उशिरा पेरणीस योग्य, खरिपासाठी चांगली.
भानू ८५ - ९० १२ - १३ सर्व हंगामासाठी तसेच अवर्षणप्रवण विभागासाठी योग्य.

संकरित वाण

वाण कालावधी (दिवस) उत्पादन (किं./हे) वैशिष्ट
के.बी.एस.एच.१ ८५ - ९० १२ - १५ तेलाचे प्रमाण आधिक, अधिक उत्पादन
एल.एस.एफ.एच.१७१ ९० १८ - २० केवडा रोगास प्रतिबंधक, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश व कर्नाटक राज्यात कोरडवाहू व बागायती हंगामासाठी.
एल.एस.एफ.एच.३५ ८० - ८५ १६ - १८ केवडा रोगास प्रतिबंधक तेलाचे प्रमाण अधिक (३७ टक्के).
एल.एस.एफ.एच.०८ ९० १२ - १४ कोरडवाहू विभागासाठी, केवडा रोगास प्रतिबंधक.
के.बी.एस.एच. ४४ ९० - ९५ १४ - १६ अधिक उत्पादन क्षमता.
फुले रविराज ९० - ९५ १७ - २० पश्चिम महाराष्ट्रात खरीप हंगामात उशिरा पेरणीसाठी प्रसारित केलेला अधिक उत्पादन देणारा संकरीत वाण. बड नेक्रोसीस रोगास प्रतिकारक्षम.
एम.एस.एफ.एच. १७ ९० - ९५ १८ - २० केवडा रोगास प्रतिबंधक, महाराष्ट्रात खरीप व रब्बी हंगामात कोरडवाहू व बागायती करिता शिफारस केली आहे.

पेरणी

खरीप: जुलै पहिला पंधरवडा.
रब्बी: ऑक्टोबर पहिला पंधरवडा ते नोव्हेंबर पहिला पंधरवडा.

उन्हाळी: फेब्रुवारी पहिला पंधरवडा.

रासायनिक खत

कोरडवाहू पिकास प्रति हेक्टरी २.५ टन शेणखत तसेच ५० किलो नत्र, २५ किलो स्फुरद आणि २५ किलो पालाश पेरणीच्या वेळेस दोन चाडयाच्या पाभरीने पेरून द्यावे. बागायती पिकास प्रति हेक्टरी ६० किलो नत्र + ६० किलो स्फुरद + ६० किलो पालाश द्यावे. यापैकी ३० किलो नत्र व संपूर्ण स्फुरद आणि पालाश पेरणीच्या वेळी द्यावे व उरलेल्या ३० किलो नत्राची मात्रा पेरणी नंतर एक महिन्याच्या आत द्यावी. गंधकाची कमतरता असलेल्या जमिनीसाठी प्रति हेक्टर २० किलो गंधक पेरणीच्या वेळी गांडूळ खतातून द्यावे.

बियाणे

सुर्यफुलाच्या पेरणीसाठी सुधारित वाणाचे ८ - १० किलो बियाणे आणि संकरीत वाणाचे ५ ते ६ किलो बियाणे प्रति हेक्टर वापरावे.

उत्पादन

कोरडवाहू पिकापासून प्रति हेक्टरी ८ ते १० क्विंटल, संकरीत वाणापासून १२ ते १५ क्विंटल आणि बागायती / संकारीत वाणापासून प्रति हेक्टरी १५ ते २० क्विंटल उत्पादन मिळते.