तील

सुधारित वाण

वाण कालावधी (दिवस) उत्पादन (किं.ग्रॅ/हे) विशेष गुणधर्म
फुले तीळ नं. १ ९० - ९५ ५०० - ६०० पंधरा टपोरा दाणा, अर्ध रब्बी हंगाम सोडून संपूर्ण महाराष्ट्रासाठी शिफारास.
तापी ( जे.एल.टी. ७) ८० - ८५ ६०० - ७०० पांढरा दाणा, खान्देश व मराठवाडयातील औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील क्षेत्र.
पद्मा (जे.एल.टी. २६) ७२ - ७८ ६५० - ७५० फिक्कट तपकिरी दाण्याचा रंग, लवकर येणारी व दुबार पीक लागवडीस योग्य. जळगाव, धुळे, बुलढाणा व अकोला जिल्ह्यातील तिळीचे क्षेत्र.
जे.एल.टी. ४०८ ८१ - ८५ ७५० - ८०० पांढरा टपोरा दाणा, मध्यम कालावधी अधिक उत्पादन क्षमता, तेलाचे प्रमाण जास्त, हमखास पाऊस पडणाऱ्या खान्देश व लगतच्या विदर्भ, मराठवाडा विभागातील क्षेत्राकरिता खरीप हंगामासाठी.

पेरणी

मान्सूनचा पाऊस झाल्यावर आणि योग्य वाफसा आल्यावर जूनच्या दुसऱ्या आठवडया पासून जुलैच्या पहिल्या आठवडया पर्यंत.

बियाणे

प्रति हेक्टर २.५ ते ३ किलो (एकरी १ किलो) बियाणे.

खत

पूर्व मशागतीच्या वेळी शेवटच्या कुळवाच्या अगोदर प्रति हेक्टरी ५ टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे किंवा हेक्टरी एक टन (एकरी ४ क्विंटल) एरंडी किंवा निंबोळी पेंड पेरणी बरोबर द्यावी. आधिक २५ किलो नत्र प्रती हेक्टरी पेरणीच्या वेळी व २५ किलो नत्र प्रति हेक्टर पेरणीनंतर तीन आठवडयांनी. सूक्ष्म अन्नद्रव्यांची जमिनीत कमतरता असल्यास पेरणीच्या वेळी २० किलो गंधक प्रती हेक्टरी द्यावे.

उत्पादन

पावसाचे वितरण चांगले असल्यास साधारणतः हेक्टरी ६ ते ७ क्विंटल जिरायताखाली उत्पादन मिळेल.