Home

तेलवर्गीय पीके

भुईमुग

सुधारित वाण

वाण हंगाम कालावधी उत्पादन (किं./हे) शिफारास
एस.बी. - ११

खरीप/
उन्हाळी

१०५ - ११०
११५ - १२०
१२ - १५
१५ - २०
संपुर्ण महाराष्ट्रासाठी
जे. एल. -२४ (फुले प्रगती) खरीप ९० - ९५ १८ - २० संपुर्ण महाराष्ट्रासाठी
टी.अे.जी. - २४

खरीप/
उन्हाळी

१०० - १०५
११० - ११५
२० - २५
५ - ३०
संपुर्ण महाराष्ट्रासाठी
जे.एल. - २२० (फुले व्यास) खरीप ९० - ९५ २० -२५ जाड दाण्याची, जळगाव, धुळे, अकोला जिल्ह्यांकरिता
जे.एल. - २८६ (फुले उनप) खरीप/
उन्हाळी
९० - ९५ २० -२५ पश्चिम महाराष्ट्रासाठी व जळगाव, धुळे, अकोला जिल्ह्यांकरिता.
टी.पी.जी. - ४१ रब्बी/
उन्हाळी
१२५ - १३० २५ -३० जाड दाण्याची, पश्चिम महाराष्ट्रासाठी व जळगाव, धुळे, अकोला जिल्ह्यांकरिता.
टी.जी. - २६

खरीप/
उन्हाळी

९५ - १००
११० - ११५
१५ - १६
५ - ३०
संपुर्ण महाराष्ट्रासाठी
जे.एल. - ५०१

खरीप/
उन्हाळी

९९ - १०४
११० - ११५
१६ - १८
३० - ३२
म.फु.कृ.वि. राहुरी कार्यक्षेत्रातील सर्व जिल्हे
फुले आर.एच.आर.जी. - ६०२१ उन्हाळी १२० - १२५ ३० - ३५ पश्चिम महाराष्ट्रासाठी
फुले उन्नती

खरीप/
उन्हाळी

११० - ११५
१२० - १२५
२० - २५
३० - ३५
संपुर्ण महाराष्ट्रासाठी
जे.एल. - ७७६ (फुले भारती) खरीप ११५ - १२० २० - २५ उत्तर महाराष्ट्रासाठी

पेरणी

खरीप: १५ जून ते १५ जुलै
उन्हाळी: १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी

बियाणे

१०० किलो: एसबी - ११, टीएजी - २४, टीजी - २६, जेएल - ५०१, फुले - ६०२१
१२० ते १२५ किलो: फुले प्रगती, फुले व्यास, टीपीजी - ४१, फुले उनप, फुले उन्नती

खत मात्रा

पूर्व मशागतीच्या वेळी प्रती हेक्टरी २० गाडया कंपोस्ट किंवा चांगले कुजलेले शेणखत जमिमित मिसळून द्यावे. पेरणीच्या वेळेस २० किलो नत्र + ५० किलो स्फुरद द्यावे. अधिक उत्पादनासाठी रासायनिक खत मात्रे सोबत जिप्सम ४०० कि/हे जमिनीत मिसळून द्यावे.

उत्पादन

खरीप: सरासरी १८ ते २० क्विंटल/हेक्टर
उन्हाळी: सरासरी २५ ते ३० क्विंटल/हेक्टर

सोयाबीन

सुधारित वाण

जे.एस.३३५, एम.ए.सी.एस.११८८, फुले कल्याणी (डी.एस.२२८), जे.एस.९३०५, के.एस.१०३, फुले अग्रणी( केडीएस ३४४)

पेरणी व लागवड पद्धत

भारी जमीन: ४५ सें.मी. X ०५ सें.मी.
मध्यम जमीन: ३० सें.मी. X १० सें.मी.

बियाणे

सलग पेरणी: ७५ - ८० किलो प्रती हेक्टर
टोकन पेरणी: ४५ - ५० किलो प्रती हेक्टर

खत व्यवस्थापन

भरखते: चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्टरी २५ ते ३० गाडया वापरावे.
वरखते: सोयाबीन पिकास हेक्टरी ५० किलो नत्र आणि ७५ किलो स्फुरद पेरणीच्या वेळी द्यावे.

उत्पादन

सोयाबीन पिकाचे उत्पादन सरासरी २० ते २५ क्विंटल/हेक्टर.

करडई

सुधारित वाण

वाण कालावधी (दिवस) उत्पादन (किं./हे) विशेष गुणधर्म
भीमा १३० - १३५ १३ - १५ कोरडवाहू क्षेत्रास योग्य.
फुले-कुसुमा १३५ - १४० १४ - १६ कोरडवाहू तसेच संरक्षित पाण्याखाली योग्य.
एस.एस.एफ.६५८ ११५ - १२० १२ - १३ बिगर काटेरी अखिल योग्य भारतीय स्तरावर लागवडीसाठी.
एस.एस.एफ.७०८ ११५ - १२० कोरडवाहू: १३ - १५
बागायती: २० -  २२
पश्चिम महाराष्ट्रात लागवडीसाठी योग्य कोरडवाहू तसेच बागायती.
फुले करडई - ७३३ १२० -१२५ १३ -१५ कोरडवाहू लागवडीसाठी.
फुले चंद्रभागा
(एस.एस.एफ.७४८)
१३० - १४० कोरडवाहू: १३ - १५
बागायती: २० - २२
कोरडवाहू तसेच बागायती लागवडीसाठी.
पी.बी.एन.एस.१२ १३५ - १३७ १२ - १५ मराठवाडा विभागास योग्य.
नारी - ६ १३० - १३५ १० - १२ बिन काटयची, पाकळ्या गोळा करण्यास योग्य.
नारी एन.एच. - १ १३० - १३५ १२ - १४ संकरीत वाण, बिन करण्यास योग्य काटेरी.

पेरणी

 पेरणी सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवडा ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडया पर्यंत करण्याची शिफारस करण्यात येत आहे.

बियाणे

प्रति हेक्टर १० ते १२ किलो बियाणे

रासायनिक खत

५० किलो नत्र (११० किलो युरिया) आणि २५ किलो स्फुरद (१५६ किलो सिंगल सुपर फॉसफेट) प्रति हेक्टर. बागायती करडई साठी ६० किलो नत्र + ३० किलो स्फुरद प्रति हेक्टर.

उत्पादन

मध्यम जमीन: सरासरी १२ ते १४ क्विंटल/हेक्टर
खोल जमीन: सरासरी १४ ते १६ क्विंटल/हेक्टर
बागायती जमीन: सरासरी २० ते २५ क्विंटल/हेक्टर

तील

सुधारित वाण

वाण कालावधी (दिवस) उत्पादन (किं.ग्रॅ/हे) विशेष गुणधर्म
फुले तीळ नं. १ ९० - ९५ ५०० - ६०० पंधरा टपोरा दाणा, अर्ध रब्बी हंगाम सोडून संपूर्ण महाराष्ट्रासाठी शिफारास.
तापी ( जे.एल.टी. ७) ८० - ८५ ६०० - ७०० पांढरा दाणा, खान्देश व मराठवाडयातील औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील क्षेत्र.
पद्मा (जे.एल.टी. २६) ७२ - ७८ ६५० - ७५० फिक्कट तपकिरी दाण्याचा रंग, लवकर येणारी व दुबार पीक लागवडीस योग्य. जळगाव, धुळे, बुलढाणा व अकोला जिल्ह्यातील तिळीचे क्षेत्र.
जे.एल.टी. ४०८ ८१ - ८५ ७५० - ८०० पांढरा टपोरा दाणा, मध्यम कालावधी अधिक उत्पादन क्षमता, तेलाचे प्रमाण जास्त, हमखास पाऊस पडणाऱ्या खान्देश व लगतच्या विदर्भ, मराठवाडा विभागातील क्षेत्राकरिता खरीप हंगामासाठी.

पेरणी

मान्सूनचा पाऊस झाल्यावर आणि योग्य वाफसा आल्यावर जूनच्या दुसऱ्या आठवडया पासून जुलैच्या पहिल्या आठवडया पर्यंत.

बियाणे

प्रति हेक्टर २.५ ते ३ किलो (एकरी १ किलो) बियाणे.

खत

पूर्व मशागतीच्या वेळी शेवटच्या कुळवाच्या अगोदर प्रति हेक्टरी ५ टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे किंवा हेक्टरी एक टन (एकरी ४ क्विंटल) एरंडी किंवा निंबोळी पेंड पेरणी बरोबर द्यावी. आधिक २५ किलो नत्र प्रती हेक्टरी पेरणीच्या वेळी व २५ किलो नत्र प्रति हेक्टर पेरणीनंतर तीन आठवडयांनी. सूक्ष्म अन्नद्रव्यांची जमिनीत कमतरता असल्यास पेरणीच्या वेळी २० किलो गंधक प्रती हेक्टरी द्यावे.

उत्पादन

पावसाचे वितरण चांगले असल्यास साधारणतः हेक्टरी ६ ते ७ क्विंटल जिरायताखाली उत्पादन मिळेल.

सुर्यफुल

सुधारित वाण

वाण कालावधी (दिवस) उत्पादन (किं./हे) वैशिष्ट
फुले भास्कर ८० - ८४ १५ - १८ कमी कालावधी, चमकदार काळेभोर टपोरे दाणे तेलाचे प्रमाण अधिक व महाराष्ट्राच्या अवर्षण भागासाठी प्रसारित.
एस.एस.५६ ८० - ८५ १० - ११ कमी कालावधी, उशिरा पेरणीस योग्य, दुबार, आंतरपीक पद्धतीस व अवर्षण प्रवण भागास योग्य.
मॉर्डेन ८० - ८५ ८ - १० कमी कालावधी, बुटकी, उशिरा पेरणी, दुबार आंतरपीकास योग्य.
ई.सी.६८४१४ १०० - ११० १० - १२ अधिक उत्पादनक्षम, उशिरा पेरणीस योग्य, खरिपासाठी चांगली.
भानू ८५ - ९० १२ - १३ सर्व हंगामासाठी तसेच अवर्षणप्रवण विभागासाठी योग्य.

संकरित वाण

वाण कालावधी (दिवस) उत्पादन (किं./हे) वैशिष्ट
के.बी.एस.एच.१ ८५ - ९० १२ - १५ तेलाचे प्रमाण आधिक, अधिक उत्पादन
एल.एस.एफ.एच.१७१ ९० १८ - २० केवडा रोगास प्रतिबंधक, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश व कर्नाटक राज्यात कोरडवाहू व बागायती हंगामासाठी.
एल.एस.एफ.एच.३५ ८० - ८५ १६ - १८ केवडा रोगास प्रतिबंधक तेलाचे प्रमाण अधिक (३७ टक्के).
एल.एस.एफ.एच.०८ ९० १२ - १४ कोरडवाहू विभागासाठी, केवडा रोगास प्रतिबंधक.
के.बी.एस.एच. ४४ ९० - ९५ १४ - १६ अधिक उत्पादन क्षमता.
फुले रविराज ९० - ९५ १७ - २० पश्चिम महाराष्ट्रात खरीप हंगामात उशिरा पेरणीसाठी प्रसारित केलेला अधिक उत्पादन देणारा संकरीत वाण. बड नेक्रोसीस रोगास प्रतिकारक्षम.
एम.एस.एफ.एच. १७ ९० - ९५ १८ - २० केवडा रोगास प्रतिबंधक, महाराष्ट्रात खरीप व रब्बी हंगामात कोरडवाहू व बागायती करिता शिफारस केली आहे.

पेरणी

खरीप: जुलै पहिला पंधरवडा.
रब्बी: ऑक्टोबर पहिला पंधरवडा ते नोव्हेंबर पहिला पंधरवडा.

उन्हाळी: फेब्रुवारी पहिला पंधरवडा.

रासायनिक खत

कोरडवाहू पिकास प्रति हेक्टरी २.५ टन शेणखत तसेच ५० किलो नत्र, २५ किलो स्फुरद आणि २५ किलो पालाश पेरणीच्या वेळेस दोन चाडयाच्या पाभरीने पेरून द्यावे. बागायती पिकास प्रति हेक्टरी ६० किलो नत्र + ६० किलो स्फुरद + ६० किलो पालाश द्यावे. यापैकी ३० किलो नत्र व संपूर्ण स्फुरद आणि पालाश पेरणीच्या वेळी द्यावे व उरलेल्या ३० किलो नत्राची मात्रा पेरणी नंतर एक महिन्याच्या आत द्यावी. गंधकाची कमतरता असलेल्या जमिनीसाठी प्रति हेक्टर २० किलो गंधक पेरणीच्या वेळी गांडूळ खतातून द्यावे.

बियाणे.

सुर्यफुलाच्या पेरणीसाठी सुधारित वाणाचे ८ - १० किलो बियाणे आणि संकरीत वाणाचे ५ ते ६ किलो बियाणे प्रति हेक्टर वापरावे.

उत्पादन

कोरडवाहू पिकापासून प्रति हेक्टरी ८ ते १० क्विंटल, संकरीत वाणापासून १२ ते १५ क्विंटल आणि बागायती / संकारीत वाणापासून प्रति हेक्टरी १५ ते २० क्विंटल उत्पादन मिळते.

K.V.K. Jalgaon